“माझे आरोग्य. . . माझी जबाबदारी. . . ।”

मी आणि सुरेश, माझा मित्र, एकदा माझ्या वयक्तिक माकरिता पुण्याला निघालो होतो. मग सहज म्हणालो गावाच्याबाहेर पेट्रोलपंपावर आपण पेट्रोल टाकूया, तर सुरेशने लगेच उत्तर दिल नाही

  “आपण कामादारच्यापंपावरच पेट्रोल टाकूया ”

मी म्हणालो “अरे कशाला एकतर आपल्याला उलट फिरुन जाव लागेल आणि शहरा पेक्षा बाहेर पेट्रोल स्वस्त मिळत”

“नाही. माझ ठरलेल आहे या गाडीत पेट्रोल मी कामदारच्या पेट्रोलपंपावरच टाकतो, मग ते काहिही होवो आणि याच कारणामूळे माझ्या इंडीगोला 8 वर्ष झालीत तरी पण आजपर्यंत कसलीच तक्रार नाही. माझ इंजिन ऑईल देखील मी येथुनच आणि सर्वोच घेतो यामुळे एव्हढ्यावर्षात अजून इंजीन उघडायची गरजच पडली नाही”  सुरेश म्हणाला.

मग त्याच्या आग्रहामुळे आम्ही पुर्ण वळसाघालून, दोन चौक पार करुन कामदार पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून. पुण्याच्या दिशेने निघालो. काही वेळ गेल्यावर सुरेश गाडी चालवण्यात मग्न झाला. मलाही थोडी डुलकी लागत होती. त्यामुळे एक वेगळीच शांतता गाडीत होती.

      या शांततेत माझ्या मनात विचार आला “हा माझा इंजीनीयर मित्र त्याच्या निर्जीव गाडीच्या चांगल्या आरोग्याचा विचार कराताना गाडीज्यावर चालते त्या इधनाचा, गाडीचे बल म्हणजे गाडीच्या इंजीनाचा किती विचार करतो आणि त्या विचारांची काटेकोर अंमलबजावणी करतो, मग जिवंत माणूस या देह रुपि इंजीनाचा एव्हढा विचार का करत नसेल बर. . . ?” या शरिराचे पोषण करणारे अन्न, बल उत्तम ठेवणारा व्यायाम आणि सर्विसिंग करणारे पंचकर्म हा विचार समोर आला की लोक आपल्या सोय़ीचा, आवडीचा, कमीकष्टाचा, कमीखर्चाचा विचार मात्र कटाक्षाने करतात आणि खरच याच कारणामुळे जगभरातील रुग्णांच्या संख्याचा व रुग्णालयांचा अनुपात हा सतत वाढतच आहे.

      कोणालाही विचारल कि आरोग्यासाठी तुम्ही काय करता तर सहच उत्तर मिळतात “आम्ही दर महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन चेकप करुन घेतो.” “मी माझ्या गोळ्या अगदि नियमीत आछवणीने, आलाराम लावून घेते” “आम्ही घरातील सर्वजन दर सहा महिन्याला सर्वंकष तपासणी करुन घेतो” म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला निरोगि आरोग्य म्हणल कि डॉक्टर, दवाखाना इत्यादी आरोग्य सुविधांची आठवण येते. आपण आपल्या आरोग्याची जबाबदारी अगदी जबाबदारपणे डॉक्टर, रुग्णालयांवर सोपवून मनाप्रमाणे जगत आहोत. या वेळी मला

आत्मानं एव मन्येत कर्तार: सुखदु:खयो:” हे चरकसंहितेतील सुत्र किंवा

“उद्धरेत् आत्म आत्मानम्. . . ।”

हे भग्वतगीतेतील सुत्र आठवत आणि सांगावस वाटत कि जस आपण करियरच्याबावतीत आपण म्हणतो कि आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत त्या प्रमाणेच आपल्या आरोग्याचे शिल्पकार किंवा आरोग्या करिता जबाबदार आहोत. आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपणच सतत, निरलसपणे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. आरोग्य हि जर आपली धन संपदा असेल, तर ही आपली धन संपदा दुसऱ्याच्या हातात देऊन कशी चालेल ? ती नाहीशी होऊ शकते म्हणून हि माझी आरोग्यरुपि धन-संपदा टिकवणे व वाढवणे या करिता प्रथम पुरुषी एक वचनी मलाच सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.

       महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहान केलय कि “ माझे कुटुंब माझी जबाबदारी” ते खरच आरोग्यदायीच आहे पण मला त्याच्या पुढे जाऊन अस म्हणावस वाटत कि “ माझे आरोग्य. . . माझी जबाबदारी. . . ” या तत्वाच पालन जर जगातील प्रत्येक नागरिकाने केल तर आज जगाला भेडसावणारी करोनाची भिती आणि स्वत: करोनापण भिऊन निघुन जाईल. कारण 

“नही निर्दोषं शरिरं ज्वरं समुपसेवते। चरक संहिता”  

म्हणजे जर आरोग्य खणखणीत असेल तर बाहेरील कोणताही रोग किंवा विषाणू आपल्या शरितात शिरु शकत नाही आणि शिरलाच तर आरोग्याच काही नुकसान करु शकत नाही.

      म्हणूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेवूयात. या देहाकतरीता इंधन असणारा आहार कोणता घ्यायचा, कधी घ्यायचा, बला करिता नित्य व्यायाम कोणता करायचा, शरिराची सर्विसिंग म्हणून पंचकर्म कोणते करायचे आदी संबंधीचे सशास्त्रीय ज्ञान घेवूयात, आवश्यक त्यावेळी वैद्याचा सल्ला घेवून आपली धन संपदा आरोग्यदायी करुया.